पुरस्कार व पारितोषिके

शालेय काळात रविवार सकाळ आंतरशालेय नाट्यसंगीत स्पर्धेत सलग ३ वर्षे प्रथम क्रमांक.  .

 

महाविद्यालयीन काळात 'फिरोदिया करंडक (शास्त्रीय गायन )' 'कल्याणी करंडक (शास्त्रीय गायन )' 'कल्याणी करंडक (उपशास्त्रीय गायन )' 'स्वरमाधुरी करंडक(शास्त्रीय गायन ) ' 'रंगशारदा प्रतिष्ठान च्या विद्याधर गोखले स्मृती स्पर्धा (नाट्यसंगीत गायन )' 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर च्या ज्योत्स्ना भोळे स्मृती स्पर्धा (नाट्यसंगीत गायन )'  या सर्व प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये एकाच वर्षी प्रथम क्रमांक. .

 

आकाशवाणी राष्ट्रीय संगीत स्पर्धा २००७ - ठुमरी दादरा व टप्पा गायानासाठीचा पुरस्कार .

 

गानवर्धन या पुण्यातील प्रथितयश संस्थेतर्फे शास्त्रीय गायनासाठी पुरस्कार व उपशास्त्रीय गायनासाठी शिष्यवृत्ती .

 

"पुणे मराठी ग्रंथालय " यांच्यातर्फे "संगीतरत्न नरहरबुवा पाटणकर स्मृती पुरस्कार "

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 'यशवंत भगवंत कुलकर्णी स्मृती युवा कलाकार पुरस्कार '

 

शास्त्रीय संगीतातले ऋषितुल्य गुरु पं गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतीनिमित्त "पं गंगाधरबुवा पिंपळखरे स्मृती युवा कलाकार पुरस्कार "

 

स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान व बालगंधर्व संगीत रसिक मंडळ यांच्यातर्फे "स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार "

 

पुणे भारत गायन समाज यांच्यातर्फे "मालती पांडे -बर्वे स्मृती पुरस्कार "

 

डॉ . वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा "डॉ . वसंतराव देशपांडे पुरस्कार " 
 

लंडन येथील DURHAM UNIVERSITY येथील भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यासकांसाठी  सप्रयोग विवेचन व मैफलीमध्ये सहभागी होण्याचा बहुमान



© www.atulkhandekar.com
Developed By : Maitraee Graphics